भट कुळाविषयी

वेद हे ईश्वरप्रणीत म्हणून ते अपौरुषेय आहेत असे म्हणतात. विश्वाची उत्पती हे या वेदाचे फलीत आहे. ईश्वराने आधी सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवास उत्पन्न केले व ब्रह्मदेवाने सृष्ठी निर्माण करण्यास सुरुवात केल्यावर सर्वात अखेरची अविकृत आकृती म्हणजे मानव होय.सृजनकार्यासाठी ब्रह्मदेवाने कश्यपादि सात मानसपुत्रांची उत्पती केली. त्यापैकी चौकस पुत्र भारद्वाज याने वेदस्वरुपाबहल विचारणा केल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना वेदराशीचे दर्शन घडविले, त्या विराट वेदस्वरुपदर्शनाने भयभीत झालेल्या भारद्वाजानी ब्रह्मदेवाजवळ आपण सांगाल तेवढेच शिकेन असे कबूल केले. तेव्हा ब्रह्मदेवानी चार मुठी भरुन भारद्वाजाना दिल्या. ते चार वेद म्हणजे (१) ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद व (४) अथर्ववेद. भारद्वाजानी पुढे हे चार वेद आपल्या चार शिष्यांना शिकवले. त्यापैकी ऋग्वेद पैल शिष्यास शिकवला. वेद शिक्षण श्रुती व स्मृती अश्या दोन पध्दतीने करावे लागे. ऋग्वेदाच्या बारा शाखा आहेत (१) श्रावक (२) श्रवणी (३) व (४) पराक्रमा (५) दंड(६) षटक्रमा (७) आश्वलायना (८) शांखावनी (९) शाकला (१०) बाष्कळा (११) मांडुका (१२)ऐतरेया अश्या बारा शाखा आहेत.

त्यापैकी भट हे शाकल शाखेचे आहेत. ऋग्वेदाच्या नियामक(सूत्रकार) शौनकाचा शिष्य आश्वलायन हा आहे. भट काश्यप गोत्री हे आश्वलायन सूत्र शाकलशाखाध्यायी आहेत असे म्हटले जाते.

border-separator

सभासद मंडळ

संपर्क

१. श्री. रामचंद्र भट : ९०११०६७८५४

२. श्री. शशिकांत पंडित : ९८२२८३८९९८

३. सौ. रुच एस भट : ९६५७७२५४७२

४. सौ. पद्मजा एम भट : ९४२२२४९४७४

५. सौ. धनश्री डी भट : ९९२२८९३९७२

६. सौ. अश्विनी विद्धवांस : ९०११०६८४८५

Note: Website is under development. During the process some data may be lost or some mismatched information might get displayed.